सीबीआय मुख्यालयाबाहेर कॉंग्रेसचे आंदोलन 

संग्रहित छायाचित्र...

देशभरात निदर्शने : राहुल गांधी यांना ताब्यात घेवून सोडले

नवी दिल्ली – सीबीआयमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाला कथित राफेल घोटाळ्याशी जोडून कॉंग्रेसने आज देशव्यापी आंदोलन केले. दिल्लीत सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अशोक गहलोत, प्रमोद तिवारी यांच्यासह इतर नेत्यांनी स्वत:ची प्रतिकात्मक अटक करुन घेतली. यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांना लोधी रोज पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात दयाल सिंह कॉलेजपासून सुरु झालेला कॉंग्रेसचा मोर्चा सीबीआय मुख्यालयापर्यंत संपला. यानंतर तिथे कॉंग्रेसने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

सीबीआय संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार काढल्याच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. राफेल डीलच्या चौकशीपासून सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप राहुल गांधी यावेळी मोदी सरकारवर केला.
राहुल गांधी म्हणाले, कॉंग्रेस चौकीदाराला चोरी करु देणार नाही. भारतातील प्रत्येक संस्थेत पंतप्रधान मोदी यांच्याकडून हस्तक्षेप होत आहेत. नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या फायदा होण्यासाठीच राफेल करार केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या करारात राफेलची किंमत वाढवून कोटयवधी रूपये अनिल अंबानींच्या खिशात घातले आहेत. सीबीआय संचालक आलोक वर्मा हे राफेल कराराची चौकशी करणार असल्याची कुणकुण लागल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आलोक वर्मा यांचे अधिकार त्यांना पुन्हा बहाल करुन पंतप्रधानांनी या मुद्‌द्‌यावर माफी मागावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणासह अनेक राज्यात सीबीआय कार्यालयाबाहेर कॉंग्रेसने निदर्शने केली. कॉंग्रेसच्या या निदर्शनांना इतर विरोधी पक्षांचीही साथ मिळाली. कॉंग्रेससह टीएमसी आणि सीपीआय नेतेही आंदोलनात सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)