सीबीआय मधील मोदींच्या लाडक्‍याने मल्ल्याविषयीची नोटीस बदलली

नवी दिल्ली – विजय मल्ल्याच्या बाबतीत ध चा मा करणारी सीबीआयची नोटीस नेमकी कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून बदलली हा सध्या दिल्लीच्या राजकारणातील केंद्र बिंदु ठरला आहे. त्याविषयी आता काही नवीन बाबी पुढे येत आहेत. त्याच संबंधात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे की सीबीआय मधील मोदींच्या लाडक्‍या अधिकाऱ्यानेच ही नोटीस बदलली आहे.

ए के शर्मा असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते गुजरात केडरचे अधिकारी आहेत. सीबीआयतर्फे मल्ल्यांना विमानतळावर ताब्यात घेण्याची जी नोटीस जारी करण्यात आली होती ती त्यांनीच बदलली आणि त्यात मल्ल्यांबाबत केवळ माहिती द्या असा शब्द प्रयोग वापरला.त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत मल्ल्या यांना लंडन पळून जाता आले. शर्मा हे सीबीआय मधील त्यावेळी ज्युनिअर अधिकारी होते. पण आता त्यांच्याच कडे नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सींचा तपास आहे. त्यांनीच त्या दोघांनाही पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
सीबीआयच्या तत्कालिन प्रमुखांनीही अशीच माहिती दिली आहे.

ए. के. शर्मा हे सीबीआयचे माझ्या काळात अत्यंत ज्युनिअर अधिकारी होते. त्यांच्या अधिकार कक्षेनुसार 60 कोटी रूपयांच्या वरील प्रकरणात लक्ष घालण्याचा किंवा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार नाही. परंतु तरीही त्यांनी आपल्या अपरोक्षच मल्ल्या याच्या विषयीच्या लूक आऊट नोटीशीत बदल करून ती नोटीस सौम्य केली असे सीबीआयचे तत्कालिन संचालक अनिल सिन्हा यांनी एक वाहिनीशी बोलताना सांगितले.

आता ए. के शर्मा नावाचा गुजरात केडरचा अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून नोटीशीत परस्पर बदल करून मल्ल्याची मदत करतो असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यावर राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)