कोर्टाने मोदी सरकारला चपराक लावली- नवाब मलिक

नवी दिल्ली: केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवलेले सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना पुन्हा त्या पदावर नियुक्त करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. वर्मा यांना सक्तीचा रजेवर पाठवण्याचा सरकारचा निर्णय न्यायालयाने रद्द बातल ठरवला आहे.

दरम्यान राजकीय नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द करत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. हा निर्णय कोर्टाने रद्द करुन मोदी सरकारला एक चपराक लावली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

वर्मा यांच्या वरील आरोपांची केंद्रीय दक्षता आयोगाकडून चौकशी सुरू असून त्या समितीच्या निष्कर्षाच्या आधारेच वर्मा यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यावा असेही कोर्टाने सरकारला सुनावले आहे.

केंद्र सरकारने वर्मा यांना त्यांचे अधिकार काढून घेऊन सक्तीच्या रजेवर पाठवले होते. सरकारच्या या निर्णयाला वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

अलोक वर्मांनी कारवाईला दिले सुप्रिम कोर्टात आव्हान 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)