सीबीआय प्रमुख अलोक वर्मा आणि विशेष संचालक अस्थाना यांचे सर्वाधिकार घेतले काढून 

नवी दिल्ली: सीबीआयच्या उच्चपदस्थांमध्ये लाचखोरीच्या विषयावरून जाहीर आरोपप्रत्यारोप झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा आणि विशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना या दोघांकडील अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. सीबीआयच्या इतिहासात प्रथमच प्रमुख आणि उपप्रमुखांनी एकमेकांच्या विरोधात असे जाहीर आरोप केल्याची घटना घडली असून सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
पंतप्रधानांनी या आरोपांच्या संबंधात चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती नेमली आहे. या समितीने काल रात्रीच सीबीआय संचालकांकडील सर्व अधिकार काढून घेऊन ते सीबीआयचे जॉईन्ट डायरेक्‍टर एम नागेश्‍वर राव यांना दिले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणीही करण्यात आली आहे. अस्थाना यांनी आपल्या तक्रारीत सीबीआयच्या ज्या अतिरीक्त संचालकांची नावे घेतली आहेत त्या तिन्ही सहायक संचालकांना वगळून सरकारने पदश्रेणीत तुलनेने खालच्या पातळीवर असलेल्या नागेश्‍वर राव यांना तात्पुरत्या स्वरूपात सीबीआय प्रमुखांचे अधिकार दिले आहेत.
दरम्यान या प्रकरणात सीबीआयच्या मुख्यालयालाच सील ठोकण्यात आल्याचे वृत्त होते. तेथे सीबीआच्या अन्य अधिकाऱ्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली असे सांगण्यात येत होते. तथापी चौकशी पथक तेथे असे पर्यंतच सीबीआय मुख्यालय बंद ठेवण्यात आले होते पण ते आता उघडण्यात आले आहे असे नंतर स्पष्ट करण्यात आले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)