सीबीआय प्रकरण तापण्याची चिन्हे, वर्मांच्या समर्थनार्थ कॉंग्रेस सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली: कॉंग्रेसने आज केंद्र सरकारने सीबीआय संचालक अलोक वर्मा यांची पदावरून उचलबांगडी केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून सरकारची ही कारवाई पुर्ण बेकायदेशीर आणि मनमानी स्वरूपाची असल्याचा दावा या याचिकेत कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.

अलोक वर्मा यांची ज्या निवड समितीने निवड केली आहे त्यात मल्लिकार्जून खरगे यांचाही समावेश आहे. पंतप्रधान आणि सरन्यायाधिश हे या समितीचे अन्य सदस्य आहेत. या समितीने नियुक्त केलेल्या सीबीआय संचालकांचा दोन वर्षांचा कालावधी हा निश्‍चीत स्वरूपाचा असतो त्यात मनमानी पद्धतीने बदल करता येत नाही किंवा त्यांना मुदतीआधी पदावरून हटवता येत नाही असे खरगे यांचे म्हणणे आहे. जरी त्यांना या पदावरून हटवण्याचा निर्णय सरकारला घ्यायचा असेल तरीही त्यांना निवड समितीची अनुमती घेणे, बंधनकारक आहे असेही खरगे यांनी या याचिकेत म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)