सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन एका लुटले

पुणे- सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन दुचाकीवरुन आलेल्या भामट्‌यांनी रस्त्याने पायी जात असलेल्या व्यक्तीची वीस हजार रुपयांची रोकड लांबविली, 18 जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी येथे ही घटना घडली. शाम चावीर ( वय 57, रा. काकडे वस्ती, कोंढवा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावीर हे गुलटेकडी येथून रस्त्याने पायी निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना अडविले. ” आम्ही सीबीआयचे अधिकारी असून तुम्ही गांजा विकत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, त्यामुळे तुमची झडती घ्यायची आहे’ अशी बतावणी त्यांनी केली. त्यावेळी चावीर हे त्यांचे पाकिट काढत असताना चोरट्यांनी वीस हजार रुपयांची रोकड असलेले त्यांचे पाकिट लांबविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गौड अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)