सीबीआयला कोणतीच कायदेशीर चौकट नाही 

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमुर्तींचे मत 

मुंबई: देशात सीबीआय ही एक महत्वाची यंत्रणा मानली गेली असली तरी या यंत्रणेला कोणतीच कायदेशीर चौकट नाहीं असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती जस्ती चेलमेश्‍वर यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की आज सीबीआय ही संस्था घटनात्मक नाही किंवा तिला वैधानिकही स्वरूप नाही. गेले अनेक वर्षे या संस्थेचा कारभार असाच सुरू आहे. लोकांचा छळ करण्याचे अनेक अधिकार या संस्थेकडे आहेत असे ते म्हणाले. ते म्हणाले की केवळ दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लीशमेंट ऍक्‍ट नुसार ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

कॉंग्रेस पक्षाशी संबंधीत असलेल्या ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेस या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज कोणत्याही राज्यात राजकीयदृष्ट्या कोणतेही एखादे संवेदनशील प्रकरण घडले की लोक थेट सीबीआय चौकशीची मागणी करतात. पण त्या संस्थेतही माणसेच काम करतात आणि त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते ही बाबही आपण ध्यानात घेतली पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी तेथील चार वरीष्ठ न्यायाधिशांनी एकत्रितपणे थेट जाहीर पत्रकार परिषद घेण्याचा जो अभुतपुर्व प्रकार मध्यंतरी घडला होता त्यात चेलमेश्‍वर यांचाही समावेश होता. त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांना यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की त्यावेळी पत्रकार परिषद घेण्याखेरीज दुसरा मार्गच उरला नव्हता. सर्वोच्च न्यायालयात एकामागून एक विपरीत घटना घडल्यानंतर तत्कालिन सरन्यायाधिशांना पत्र पाठवून त्याविषयी नाराजीही व्यक्त करण्यात आली होती पण त्याचा काही एक परिणाम झाला नसल्याचे लक्षात आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याचा निर्णय आम्ही काही न्यायाधिशांनी घेतला असे त्यांनी नमूद केले. आमच्या या कृतीवर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पण आमचे प्रश्‍न अंतर्गत पातळीवरच समर्थपणे सोडवले गेले असते तर आमच्यावर ही वेळच आली नसती असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
10 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)