सीबीआयमधील वादाबाबत दक्षता आयोग आज बाजू मांडणार 

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – “सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा यांच्याविरोधात केंद्रीय दक्षता आयोगाने केलेल्या चौकशीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली जाणार आहे. वर्मा यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी दोन आठवड्यात करण्याची जबाबदारी दक्षता आयोगावर सोपवण्यात आली होती.

-Ads-

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याबरोबरच्या मतभेदांमुळे वादात अडकलेल्या वर्मा यांची चौकशी दक्षता आयोगाच्या के.व्ही.चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांकडून करण्यात आली आणि वर्मा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असल्याचे समजते आहे.  वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली दोन न्यायाधीशांच्या पिठासमोर उद्या होणार आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाकडून केल्या जात असलेल्या वर्मा यांच्या चौकशीवर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायलयाने न्या.ए.के. पटनाईक यांची नियुक्‍ती केली आहे. अस्थाना यांच्याकडील पदभार तात्पुरत्या स्वरुपात वरिष्ठ पोलिस अधिकारी एम नागेश्‍वर राव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र राव यांना कोणतेही महत्वाचे निर्णय घेता येणार नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)