सीबीआयमधील अंतर्गत वाद उच्च न्यायालयात 

एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी 

मुंबई: देश पातळीवरील महत्त्वाची तपास यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबीआयमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामाजीक कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.
सीबीआयचे सेकंड इन कमांड, विशेष संचालक राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरचे अधिकारी असून मांस निर्यातदाराकडून तीन कोटीची लाच घेतल्याचा सीबीआयनेच त्यांच्यावर आरोप केला. त्यानंतर याप्रकरणी सीबीआयने 15 ऑक्‍टोबरला विशेष संचालक अस्थापना व सीबीआयच्या एसआयटीचे उपअधिक्षक देवेंद्र कुमार यांच्यासहीत इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यात काही महिन्यात सुरु असलेल्या वर्चस्वाच्या लढ्यात देशातील महत्त्वाची तपास यंत्रणा गोत्यात आली आहे. म्हणून याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करावी. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश आणि अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असावा, अशी मागणी करणारी याचिकेत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)