नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी फरार झाल्यांनतर पहिल्यांदाच आज प्रसारमाध्यमांसमोर  येऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी सीबीआयने माझ्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे असून निराधार असल्याचे मेहुल चोक्सीने म्हंटले आहे. शिवाय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चुकीच्या पद्धतीने माझ्या संपत्ती सील केल्याचा आरोपही मेहुल चोक्सीने लावला आहे. यासंबंधीचा व्हिडीओ एक वृत्तसंस्थेने आज ट्विट केला.

वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत मेहुल चोक्सी म्हणाला की, सीबीआयने आणि ईडीने लावलेले आरोप चुकीचे व निराधार असून माझ्या संपत्ती चुकीच्या पद्धतीने सील करण्यात आल्या आहेत. शिवाय माझा पासपोर्टही कोणतेही कारण न सांगता रद्द करण्यात आला आहे. एवढेच नाही तर मी आत्मसमर्पण करण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यात कोणतेही तथ्य नसल्याचे चोक्सीने सांगितले आहे.

दरम्यान, पीएनबीमध्ये जवळपास १४ हजार कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी फरार झाले होते. चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये असून सरकार त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)