सीबीआयच्या पाटणा कार्यालयाबाहेरही निदर्शने 

पाटणा: कॉंग्रेसच्या बिहार मधील कार्यकर्त्यांनी आज सीबीआयच्या पाटणा कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांच्याकडील पदभार काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली.

कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानंतर पाटण्यात ही निदर्शने करण्यात आली. सीबीआय वाचवा लोकशाही वाचवा अशा घोषणा देत ही निदर्शने करण्यात आली. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष मदन मोहन झा म्हणाले की राफेल कराराची चौकशी सुरू केल्यामुळेच मध्यरात्री त्यांची बदली करण्याचे षडयंत्र पंतप्रधानांनी केले आहे त्यांचा हा पक्षपातीपणा त्यातून उघड झाल्याने त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या निदर्शनांना राष्ट्रीय जनता दलानेही पाठिंबा जाहीर केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)