“सीपीएस’साठी प्रवेश शूल्क आकारणार

पिंपरी – कॉलेज ऑफ फिजीशियन ऍन्ड सर्जन, मुंबई यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या सी.पी. एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश शूल्क आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) 1998 सालापासून सीपीएस हा अभ्यासक्रम घेतला जातो. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असतो. त्यासाठी कॉलेज ऑफ फिजीशियन ऍन्ड सर्जन, मुंबई यांच्या मार्फतच पात्र विद्यार्थी वायसीएम रुग्णालयात पाठवले जातात. आत्तापर्यंत महापालिका यासाठी शूल्क आकारत नव्हती. कॉलेज ऑफ फिजीशियन ऍन्ड सर्जन, मुंबई यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडून 9 लाख रुपये घेत आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी महापालिकेने धोरण आखले आहे.

-Ads-

यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कायदा सल्लागार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली. त्यांची 30 ऑगस्ट रोजी बैठक झाली. या बैठकीत विविध संस्थांकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवेश शुल्काची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार एका विद्यार्थ्यांला 9 ते 10 लाख रुपये शूल्क आकारले जाते. महापालिकेचा प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरासरी दोन वर्षासाठी 7 लाख 84 हजार 800 रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना 9 लाख रुपये प्रवेश शूल्क आकारण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मांडण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)