सीपीईसी मागे कोणताही लष्करी हेतू नाही-पाकिस्तान

इस्लामाबाद (पाकिस्तान): सीपीईसी मागे आपला कोणताही लष्करी हेतू नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे. सीपीईसी (चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) ही परियोजना केवळ पाकिस्तानची अर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीच आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैसल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

सीपीईसी नावाखाली चीन पाकिस्तानमध्ये लढाऊ विमाने आणि लष्करी सामग्रीसह तळ उभारण्याची एक गुप्त योजना असल्याची बातमी अमेरिकन माध्यमांनी दिली होती, त्या संदर्भात मुहम्मद फैसल बोलत होते. सीपीईसी हा एक आर्थिक प्रकल्प आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपली ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यास मदत मिळणार आहे. यापलीकडे सीपीईसीचा अन्य कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीपीईसी पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याने भारताने त्याबाबत हरकत घेतलेली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)