सीपीईसी प्रकल्पावरुन भारताबरोबर चर्चेने तोडगा काढू-चीन

बिजींग : सीपीईसी प्रकल्पावरुन भारताबरोबर जे मतभेदांचे मुद्दे आहेत त्यावर चर्चेने तोडगा काढण्याची तयारी चीनने दाखवली आहे. चीन-पाकिस्तानमध्ये बनवणार 50 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. त्यावरुन दोन्ही देशांमध्ये काही मुद्यांवर मतभेद आहेत. चीनमधील भारताचे राजदूत गौतम बांबावले यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीपीईसी प्रकल्पावरुन ज्या समस्या आहेत त्यावर तोडगा कढाला पाहिजे असे मत व्यक्त केले होते.
चीनच्या  परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ च्युनयिंग यांनी सुद्धा यासंबंधी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मतभेदांमुळे दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचू नये यासाठी चीन सीपीईसी प्रकल्पावरुन जे मतभेद आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे असे हुआ च्युनयिंग यांनी सांगितले. कोणा एकाला आपण समस्या सोडवायला सांगू शकत नाही. या मुद्यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी भारताबरोबर चर्चा करण्याची आमची इच्छा आहे असे च्युनयिंग म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)