सीत्कारी प्राणायाम उष्णतेच्या विकारासाठीच…

उन्हाळ्याच्या दिवसात आपण हा प्राणायाम केलाच पाहिजे. तसेच उष्ण प्रकृतीच्या लोकांनी हा प्राणायाम नियमित करावा. कोणी सीत्कारी’ तर कोणी शितकारी’ असे या प्राणायामाला म्हणतात. जी शीतलता निर्माण करते तीच शीतकारी व सीसी असा आवाज करते ती असते सीत्कारी. शीतकारीमुळे उष्णतेचे विकार कमी होतात. काहीजण याला सदन्त प्राणायाम असेही म्हणतात.

      प्रत्यक्ष कृती

योग्य ते आसन निवडावे. पद्मासन, वज्रासन, स्वस्तिकासन, सिद्धासन, सुखासन किंवा साधी मांडी यातील योग्य वाटणारे आसन घालून आसनस्थ व्हावे. नंतर आपले दोन्ही जबड्यांवरील दात म्हणजे वरखाली असणारे दात एकमेकांवर अलगद ठेवावेत. त्या दातातून बाहेरील थंड हवा सावकाश आत घ्यावी. शक्‍यतो चार आकड्यात घ्यावी. ही थंड हवा दातांवर आदळली जाते व त्यावेळी सी।। सी।। असा आवाज येईल. तोंडाने असा श्‍वास घेतल्यानंतर तोंड बंद करावे.

जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ श्‍वास रोखावा. म्हणजेच शक्‍य होईल तितका वेळ कुंभक करावे. शक्‍यतो उच्छ्वासाच्या दुप्पट कुंभक करावे.म्हणजे जर श्‍वास दोन आकड्यात घेतला तर कुंभक आठ आकड्यात व श्‍वास सोडताना मात्र तो दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश श्‍वास बाहेर टाकत आठ आकड्यात सोडावा. शक्‍यतो योग तज्ज्ञाकडून हे नीट समजावून घेऊनच मग हा प्राणायाम करावा. अशाप्रकारे सीत्कारी प्राणायाम केला जातो.

या प्राणायामाचे फायदे 

सीत्कारी प्राणायामाच्या नियमित सरावामुळे हा प्राणायाम करीत असलेल्या सर्वांची शारीरिक शक्‍ती व मनोबल वाढते.  ज्यांची पित्तप्रवृत्ती आहे म्हणजेच खाल्लेले अन्न घशाशी येणे, घशात जळजळणे, आग होणे यासारखे पित्तवृद्धीचे विकार घालवण्यासाठी रोज सीत्कारी प्राणायाम नियमित करावा.सीत्कारी प्राणायामामुळे सर्व शरीराला विशेषतः आपले डोळे, कान यांना छान थंडावा येतो. नियमित सरावामुळे मनोधैर्यात वाढ होते. पचनशक्‍ती सुधारते कारण यकृत तसेच प्लीहा योग्य प्रकारे कार्य करू लागतात ज्यामुळे पचनक्रिया उत्तमप्रकारे होऊ   लागते. झोप, आळस जाऊन जीवन उत्साहवर्धक करण्याचे सामर्थ्य सीत्कारी प्राणायामात आहे. आपोआप मनुष्याच्या तहान आणि भूकेवर नियंत्रण येते.

असा हा सीत्कारी प्राणायाम करायला सोपा आहे. फक्‍त तो प्रत्येकाने करण्याची गरज आधुनिक काळात निर्माण झाली आहे.काही वेळा मधुमेही किंवा रक्‍तदाब असलेल्यांना खूप तहान-तहान होते. सारखे पाणी पिऊन पोटाला तडस लागते, अशावेळी हा सीत्कारी प्राणायाम तहान तर भगवतोच पण उत्साहवर्धक बनवितो. जिभेची पुंगळी करून किंवा जीभ तोंडातून जोरात बाहेर काढून गार श्‍वास किंवा थंड हवा आत ओढायची असते. अन्‌ मग सावकाश दोन्ही नाकपुड्यांनी श्‍वा स सोडावा. दातावर दात ठेवून किंवा जिभेची पुंगळी करून गार हवा दोन्ही नाकपुड्यांवाटे आत घेऊन श्‍वास सोडताना जर घशातून भुंग्यासारखा आवाज काढत श्‍वास सोडावा. याला शितली भ्रामरी किंवा सीत्कारी भ्रामरी किंवा सदंत भ्रामरी असेही म्हणतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)