“सीडब्लूसी’ म्हणजे करप्शन वाली कमिटी: भाजपची टीका

संसद मोठी की “सीडब्लूसी’…? 
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) बाबत कॉंग्रेसकडून मतपेढीचे राजकारण केले जात आहे. कॉंग्रेस पक्षाला केवळ अवैध शरणार्थ्यांची नोंदणी हवी आहे. या मुद्दयावरून कॉंग्रेसचा खोटेपणा उघड झाला आहे. “एनआरसी’बाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांना राज्यसभेत बोलू दिले गेले नाही. मात्र याच विषयावर “सीडब्लूसी’मध्ये मात्र चर्चा होते आहे. कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक ही संसदेपेक्षा मोठी आहे का, असा सवालही संबित पत्रा यांनी केला. 
नवी दिल्ली: कॉंग्रेस कार्यकारिणी (सीडब्लूसी) म्हणजे “करप्शन वाली कमिटी’ असल्याची शेरेबाजी भाजपच्यावतीने करण्यत आली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्‍ते संबित बत्रा यांनी “सीडब्लूसी’ची नवी व्याख्या केली आहे.
भारतातील भ्रष्टाचाराचे प्रत्येक प्रकरण कॉंग्रेसशी जोडलेले आहे. सरकारविरोधात कॉंग्रेस दिशाभूल करून असत्य पसरवत आहे, असा आरोपही बत्रा यांनी केला. भ्रष्टाचाराचे आणि कॉंग्रेस पक्षाचे जुने नाते आहे. जेंव्हा जेंव्हा भ्रष्टाचार होतो, तेंव्हा 10 जनपथशी संबंध जोडलेला असतो. (10 जनपथ हा युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाचा पत्ता आहे.) 10 जनपथ हा देशातील भ्रष्टाचाराचा कायमचा पत्ताच झाला आहे. देशातील प्रत्येक भ्रष्ट कृत्याशी गांधी कुटुंबियांचा संबंध जोडलेला आहे, असेही ते म्हणाले.
रफेल विमानांच्या खरेदी व्यवहारामध्ये मोदी सरकारकडून अनियमितता आल्याचा आरोप भाजपने फेटाळला आहे. या व्यवहारामध्ये कोणालाही दलाली दिली गेली नसल्याने कॉंग्रेसला नैराश्‍य आले आहे. त्यातूनच सरकारविरोधात असत्य पसरवले जात आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांनी आपल्या कानात काही सांगितल्याचा दावा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. मात्र काही वेळातच फ्रेंच सरकारने निवेदन प्रसिद्धीस देऊन हा दावा खोटा ठरवला असेही पत्रा म्हणाले.
रफेल विमानांच्या दरांबाबत कॉंग्रेसने 2002 ते 2012 दरम्यान काहीही केले नाही. या किंमतींबाबत संशय बळावल्यावर सरकारने निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)