‘सीटीईटी’चे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांसाठी घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी येत्या दि. 9 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

देशातील 92 शहरांतील 2 हजार 296 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थींना सीटीईटीच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या व्यतिरिक्‍त कोणतेही स्वतंत्र प्रवेशपत्र दिले जाणार नाही. संकेतस्थळावर प्रवेशाचे ओळखपत्र उपलब्ध न झाल्यास, संबंधित परीक्षार्थींना आणखी एक संधी दिली जाणार आहे. त्यांना दि. 30 नोव्हेंबरपर्यंत परीक्षेचा अर्ज भरल्याची आणि संबंधित कागदपत्रे घेऊन सीटीईटी केंद्राशी संपर्क साधावा, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)