सीटबेल्ट बाहेर राहिल्याने उड्डाण घेतल्यानंतर करावे लागले लॅंडिंग

नगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेरच राहिल्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर सात मिनिटांनी हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्डिंग करावे लागले. त्यावेळी मैदानावर सायकल खेळणाऱ्या मुलांचीही अचानक आलेले हेलिकॉप्टर पाहून धांदल उडाली.

नगरमधील लालटाकी येथील शिक्षक विकास मंडळाचा कार्यक्रम आटोपून खा. पवार पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. रेसिडेन्शिअल कॉलेजच्या मैदानावर तयार केलेल्या हेलिपॅडवरुन पवार यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. हेलिकॉप्टर गेल्यानंतर मैदानावर मुले सायकलिंग करीत होते. सुमारे सात मिनिटानंतर हे हेलिकॉप्टर पुन्हा मैदानाच्या दिशेने आले. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस गाड्यांमधून रवाना होत होते.

मात्र, हेलिकॉप्टर आल्याचे पाहून पोलिसांचीही तारांबळ उडाली. सायकलिंग करणाऱ्या मुलांनीही जोरात पळ काढला. नुकतेच उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर पुन्हा आल्याचे पाहून पोलीसही संभ्रमात पडले. हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. पायलटने सुमारे 15 सेकंदात दरवाजा उघडून पुन्हा बंद केला आणि हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)