सीए परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी “इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जुन्या अभ्यासक्रमानुसारच्या अंतिम परीक्षेचा निकाल 15.3 टक्के तर नव्या अभ्यासक्रमानुसारच्या अंतिम परीक्षेचा निकाल 16.44 टक्के लागला आहे.

“आयसीएआय’तर्फे नोव्हेंबर 2018 मध्ये अंतिम परीक्षा (जुना अभ्यासक्रम) घेण्यात आली होती. या परीक्षेत राजस्थानमधील कोटा येथील शादाब हुसेन या विद्यार्थ्याने 74.63 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. गुजरातच्या कोडे येथील शाहीद हुसेन शोकत मेमन याने 73 टक्के गुणांसह द्वितीय तर पश्‍चिम बंगालमधील पुरुलिया येथील ऋषभ शर्मा याने 71. 88 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत राजस्थानमधील जोधपूर येथील सिद्धांत भंडारी याने 69.38 टक्के गुण मिळवत प्रथम, छत्तीसगडच्या रायपूर येथील रोहित कुमार सोनी याने 68 टक्‍क्‍यांसह द्वितीय क्रमांक पटकावला. गुजरातमधील अहमदाबादच्या पुलकित अरोरा व कोलकाता येथील जय बोहरा या दोघांनीही 67.63टक्के गुण मिळवत संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला.

फाउंडेशन परीक्षेत मध्य प्रदेशातील देवासच्या गर्वित जैन याने 93.50 टक्के गुणांसह प्रथम, हरियाणातील फरिदाबाद येथील क्षीतिज मित्तल याने 92.50 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. छत्तीसगडच्या भिलाई येथील हार्दिक गांधी, महाराष्ट्रातील जळगावच्या सौम्या जाजू व तमिळनाडूच्या सालेम येथील मृत्युंजयन रवीचंद्रन या तिघांनीही 92 टक्के गुण मिळवून संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावला.

सीपीटी परीक्षा दिलेल्या 25 हजार 37 विद्यार्थ्यांपैकी 9 हजार 38 म्हणजेच 36.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या 22 हजार 514 विद्यार्थ्यांपैकी 15.03 टक्के म्हणजेच 3 हजार 383 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 13 हजार 909 सीए झाले. नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या 4 हजार 75 विद्यार्थ्यांपैकी 670 म्हणजेच 16.44 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेनुसार 1 हजार 60 सीए झाले. फाउंडेशन परीक्षेसाठी बसलेल्या 48 हजार 702 विद्यार्थ्यांपैकी 21 हजार 488 म्हणजेच 44.12टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती “आयसीएआय’तर्फे देण्यात आली. आयसीएआयच्या पुणे शाखेचे अध्यक्ष आनंद जखोटिया यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)