सीएम चषक इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद

वरवंड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागातील तरुणाईसाठी कला व क्रीडा व्यासपीठ या स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण केले आहे. या व्यासपीठाचा युवकांना नक्कीच फायदा होईल असे सीएम चषक दौंड विधानसभा क्षेत्राचे प्रभारी, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांनी सांगितले. सीएम चषक या क्रीडा आणि कला स्पर्धेतील इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धाचे नागेश्वर विद्यालय पाटस (ता. दौंड) येथे उद्‌घाटन करण्यात आले, यावेळी वासुदेव काळे बोलत होते. तालुक्‍यातील विविध शाळांमधून सुमारे 3 हजार कलाकारांनी या चित्रकला स्पर्धेत आणि 1100 कलाकारांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला, असल्याची माहिती संयोजक हर्षद बंदीष्टी यांनी दिली. या स्पर्धांना दौंड तालुक्‍यातील गोपीनाथ विद्यालय – वरवंड , गॅरेला विद्यालय – दौंड , मनोरमा स्कुल, जवाहरलाल विद्यालय – केडगाव, स्वामी विवेकानंद विद्यालय – आंबेगाव, दत्तकला इंग्लिश स्कुल – स्वामी चिंचोली, फिरंगाई माता विद्यालय – कुरकुंभ, भानोबा विद्यालय – कुसेगाव, मेरी मेमोरियल स्कुल – पाटस या विद्यालयांत मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी योगेंद्र शितोळे, नामदेव शितोळे, तानाजी दिवेकर, मनोज फडतरे, शिवाजी ढमाले, जाकीरभाई तांबोळी, भाऊसाहेब बंदिष्टी, नवनाथ साळुंके, विनोद कुरूमकर उपस्थित होते .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)