सीएम चषकामुळे युवापिढीची गुणवत्ता उजेडात

सदाभाऊ खोत:साताऱ्यात बक्षिस वितरण सोहळा

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री चषक योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना असून यानिमित्ताने महाराष्ट्राच्या तळागाळातील युवापिढीची गुणवत्ता हेरून त्यांना उजेडात आणणे, आणि देशासाठी पदक मिळवण्यासाठी स्वयं सिध्द करणे, क्रीडा क्षेत्रातल्या या नव्या क्रांतीने संपुर्ण महाराष्ट्रात पन्नास लाख तर सातारा जिल्ह्यात 32 हजार स्पर्धक यानिमित्ताने जोडले गेले. मुख्यमंत्री सीएम चषक स्पर्धेचे हेच खरे यश आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरणे हा शिव विचार आचरणात आणणारे सरकार आहे. असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
सीएम चषक बक्षिस वितरण सोहळ्याच्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात फर्मास लावणी आणि नृत्य स्पर्धा, एकापेक्षा एक सरस कला गुण सादर करणारे स्पर्धक आणि त्याला आयोजक म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाने दिलेली भरभरून दाद या सर्व कारणांमुळे सीएम चषक हा भाजपचा राजकीय चौकार मानावा लागेल. याप्रसंगी सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, भारतीय जनता मोर्चाचे निलेश नलवडे, धनंजय जांभळे, विठ्ठल बलशेठवार, जि. प. सदस्य मनोज घोरपडे, महेंद्रकुमार पाटील, भरत पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिन नलावडे, नगरसेविका सिध्दी पवार, आशा पंडित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदाभाऊ खोत पुढे म्हणाले भाजपने गेल्या चार वर्षात लोक कल्याणाची अनेक कामे केली आहेत. ही कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या तळागाळातील क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता शोधण्यासाठी भाजपने सीएम चषक योजना राबवली आहे. या खेळाडूंमधून भविष्यात ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील यात शंका नाही. महाराष्ट्र शासनाने पिक अनुदान योजना, मुद्रा योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, शेतकरी सन्मान योजना, पंतप्रधान रोजगार योजना अशा विविध माध्यमातून राज्यात विकासाचे वेगवेगळे प्रवाह निर्माण केले आहेत. क्‍लस्टर पध्दतीने युवा वर्ग एकत्र येणार असेल तर त्यांच्या उद्योगांना 50 टक्‍के अनुदान तसेच साखर आ णि कांदा उद्योगाला बळकटी देण्यासाठी मुबलक प्रमाणात अनुदान अशा उपाययोजना करत बळीराजाला दुष्काळापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासन धडपडत आहे. या कामांना राजकारणाचा कोणताही वास नाही. कारण जनतेचा पैसा हा जनतेसाठी असतो. हा शिव विचार महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे. या चषकाच्या निमित्ताने 32 हजार युवक सातारा जिल्ह्यातून भाजपशी जोडले गेले हे सुध्दा आमच्या युवा मोर्चाचे संचित आहे. आम्ही इतर पक्षांप्रमाणे कधी सुतगिरण्या, साखर कारखाने काढले नाहीत तर जनतेच्या घामाचा पैसा जनतेसाठीच जिरवला. मराठा समाजाला आरक्षण देणारे महाराष्ट्र शासन आता धनगरांच्या आरक्षणाचा विचार करत आहे. देण्याची दानत आणि राजकीय इच्छाशक्‍ती असली की, पुढची सगळी कामे सोपे होतात. आणि ही कामे देवेंद्र फडणवीस यांच्या सुत्रबध्द मांडणीमुळे सोपी झाली आहेत. या कार्यक्रमानंतर सदाभाऊ खोत यांनी स्पर्धकांच्या लावणीचा आनंद घेतला. अनेक स्पर्धकांच्या बहारदार अशा सादरीकरणामुळे जिल्हा बॅंकेचे सभागृह दणाणले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अनिल देसाई व सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सीएम चषक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी 71 बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीएम चषकातील विजेते पुढीलप्रमाणे –
फलटण विधानसभा मतदार संघ खो-खो प्रथम क्रमांक
कराड उत्तर मतदार संघ – खो-खो मुली (मसुर) प्रथम क्रमांक
रांगोळी स्पर्धा – प्रदीप क्षीरसागर सातारा
कॅरम स्पर्धा – 1) योगेश भंडारे, सातारा (प्रथम)
2) बाळा काकडे, फलटण (द्वितिय)
मुली – 1) सायली यादव, कोरेगाव 2) पूजा चव्हाण, सातारा
शेतकरी सन्मान कबड्डी – पाटण विधानसभा मतदार संघ (प्रथम)
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ – एसजीएम कॉलेज (द्वितिय)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)