सीएनजी बससाठी खरेदीसाठी 125 कोटी द्या

पीएमपीचे पुणे महापालिकेला पत्र

पुणे – पीएमपी महामंडळ पुढील वर्षभरात 400 सीएनजी बस खरेदी करणार आहे. त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यातील 60 टक्के हिश्‍श्‍याप्रमाणे 125 कोटी रुपयांची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र, नुकतेच मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

-Ads-

पीएमपीच्या ताफ्यात एकूण 1,440 बसेस असून पीएमपीला आणखी एक हजार बसेसची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पीएमपीने प्रस्ताव तयार केला असून संचालक मंडळाने त्यास दोन दिवसांपूर्वी मान्यता दिली असली, तरी पीएमपी प्रशासनाने त्या पूर्वीच या बसखरेदीसाठी आवश्‍यक निधीचे पत्र महापालिकेस पाठविले आहे. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मदतीने 400 सीएनजी बसेस घेण्यात येणार असून जुलै-2019 अखेर टप्प्प्याटप्याने त्या ताफ्यात दाखल होतील. यासाठी पुणे महापालिका 125, तर पिंपरी चिंचवड महापालिका 75 कोटी रुपयांचा निधी देणार असून महापालिकेने या निधीची तरतूद अंदाजपत्रकात करावी, तसेच तो पीएमपीला उपलब्ध करून देण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती या पत्रात करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, हा निधी देण्यासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने स्वतंत्र निधीची तरतूद करावी लागणार असून स्थायी समिती आणि मुख्यसभेच्या मान्यतेनंतरच हा निधी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)