सीएनजी पाहिजे, तर थकबाकी भरा

एमएनजीएलचे पत्र : रक्कम पीएमपीच्या आवाक्‍याबाहेर

पुणे – आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळासमोर (पीएमपी) आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे 34 कोटींचे बिल पीएमपीने थकविले असून ते तत्काळ भरण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पीएमपीच्या अडचणी वाढल्या आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 1,235 बस सीएनजीवर चालणाऱ्या असून याठी एमएनजीएलकडून दररोज सुमारे 30 लाख रुपयांचा सीएनजी पुरवठा केला जातो. मागील काही महिन्यांपासून सीएनजी पुरवठा केल्यानंतर एमएनजीएलची बिले थकली आहेत. सध्या ही थकबाकी 34 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यासंदर्भात एमएनजीएलकडून यापूर्वी पीएमपीला पत्रव्यवहार केला. यानंतर पीएमपीने 27 नोव्हेंबर रोजी 5 कोटी रक्कम एमएनजीएलकडे भरले. मात्र, तरीही जवळपास 34 कोटींची थकबाकी असून ती सहन आवाक्‍याबाहेर जात असल्याचे एमएनजीएलचे म्हणने आहे. यामुळे लवकरात लवकर थकीत रक्कम भरावी, अशी मागणी पीएमपीकडे करण्यात आली आहे.

सीएनजी पुरवठ्याबदल्यात पीएमपीकडून वारंवार थकीत रक्कम दिली जाते. नुकतेच पाच कोटी रुपये एमएनजीएलला देण्यात आले आहे. उर्वरीत रक्कमही लवकरच देण्यात येईल.
– सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी


गॅस खरेदी करणाऱ्या कंपनीला एमएनजीएललाही वेळोवेळी पैस द्यावे लागतात. त्यात पीएमपीने थकविलेली रक्कम मोठी असल्याने गॅस खरेदी करण्यात अडचण येत आहे. व्यवहार सुरळीत चालण्यासाठी कराराप्रमाणे पीएमपीने वेळोवेळी पैसे द्यावेत.
– संतोष सोनटक्के, वाणिज्यिक प्रमुख, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमि.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)