“सीएनजी’ दरवाढीने पीएमपी गॅसवर

PMPML, Pune

दररोज पावणेदोन लाख रुपयांचा वाढीव फटका : डीझेल दरवाढीनंतर आर्थिक गाडा पुन्हा खोलात

पुणे – इंधनाच्या किंमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या पीएमपीला आता “सीएनजी’ दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. गुरूवारी मध्यरात्रीपासून पीएमपीला पुरवठा करण्यात येणाऱ्या “सीएनजी’चा दर 3 रुपये प्रतिकिलोने वाढणार आहे. यामुळे सीएनजी आता 55 रुपये किलो झाले असून दररोज तब्बल 1 लाख 86 हजार रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे.

असे वाढले सीएनजी दर (2018)


2 एप्रिल – 49 रु.किलो
16 जून – 52 रु.किलो
4 ऑक्‍टोबर – 55रु/किलो

पीएमपीला इंधनदरवाढीचा मोठा फटका बसत आहे. मे ते ऑगस्ट या चार महिन्यांत पीएमपीला मिळणाऱ्या डीझेल दरांत 4 रुपये 15 पैसे, तर एकट्या ऑगस्टमध्ये तब्बल 6 रुपये 25 पैसे वाढ झाली आहे. यामुळे तोट्यातील पीएमपीचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. यातच “सीएनजी’ दर गुरूवारपासून 3 रुपयांनी वाढ झाल्याचे पत्र महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पीएमपीला दिले आहे. आजवर 52 रुपये किलोने पीएमपीला रोज 32 लाख 24 हजार यावर खर्च करावे लागत होते. मात्र, आता ही किंमत 34 लाख 10 हजार रुपये झाली आहे. यामुळे पीएमपी “गॅस’वर आली असून लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

आकडे बोलतात


एकूण सीएनजी बसेस- 1,224
कंत्राटी – 660
पीएमपी – 564


62,000 कि.ग्रॅ.
रोज लागणारा सीएनजी


34 लाख 10 हजार रु.
नव्या दरानुसार रोज लागणार खर्च


1 लाख 86 हजार रुपये
रोजचा वाढीव भार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)