सीईओ चंदा कोचर यांच्या पतीची सीबीआय करणार प्राथमिक चौकशी

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यावर असलेल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय आता प्राथमिक चौकशी करणार आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयला गुन्हा झाल्याची शक्यता वाटल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी करण्यात येणार आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी २००८ मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी ती कंपनी केवळ ९ लाख रुपयांमध्ये चंदा यांचे पती दीपक कोचर यांना विकल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हे सर्व व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)