सीईओ अमोल येडगेसह अधिकार्‍यांचा पंकजा मुंडेंच्या हस्ते सत्कार 

पोषण अभियानात बीड जि.प.च्या महिला व बालविकास विभागाचे उत्कष्ट काम
 
मुंबई: पोषण अभियानांंतर्गत ‘पोषण माह सप्टेंबर 2018’ मध्ये जिल्हा परिषद बीडच्या महिला व बालविकास विभागाने उत्कृष्ट काम केले असून ग्राम बालविकास केंद्र ही योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आली याबद्दल राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान,बालविकास प्रकल्प अधिकारी शिरूर(का)सखाराम बांगर,बालविकास प्रकल्प अधिकारी अंबाजोगाई व्यंकटराव हुंडेकर,विस्तार अधिकारी वैभव जाधव,अजय निंबाळकर,श्रीराम जहागीरदार, पर्यवेक्षिका सुरेखा घोणशी कर,अंगणवाडी कार्यकर्तीअनिता सानप ,उर्मिला जाधव,यांचा सत्कार केला.
मंगळवार (दि.2) ऑक्टोबर रोजी मुंबईतील नरिमन पाँईन्ट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सत्कार समारंभ पार पडला. ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘पोषण माह-एक जनआंदोलन’ व ‘सबकी योजना सबका विकास’ अभियानाचा उद्घाटन समारंभ पार पडला. सर्वप्रथम  राष्ट्रपिता महात्मा गांधी, व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, श्रीमती एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त इंदिरा मालो, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी याबाबत बीड जिल्हा सर्व टीमचे अभिनंदन व कौतुक केले. त्या म्हणाल्या,‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ मध्ये बीड जिल्ह्याने केलेली प्रगती,मुलींचा वाढलेला जन्मदर जो सध्या 927 झाला आहे. याबाबत समाधान व्यक्त केले. समाजमाध्यमाचा योग्य वापर करून आपण आपला विकास साधू. आपण सर्वांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांचे विचार अंगीकार करून चला खेड्याकडे,जय जवान जय किसान हे नारे आता गंभीरपणे घ्यावे. बीड जिल्हा राज्यात कुपोषण निर्मूलन व पोषण अभियान  यात राज्यात यापुढेही अव्वल राहिला पाहिजे.
ग्रामविकास विभाग व महिला बालविकास विभागाने राबवलेल्या विविध योजना ज्यात जलयुक्त शिवार,ग्राम बाल विकास केंद्र,उमेद,महिला बचत गट चळवळ,महिला सक्षमीकरण यात विभागाचे योगदान याबाबत मार्गदर्शन केले. महिला बचतगटांना आर्थिक मदत, कर्ज यामुळे कसा बदल झाला, कसा स्वाभिमान वाढला व यातून कशाप्रकारे सबकी योजना सबका विकास साध्य होत आहे हे विशद केले. या प्रसंगी ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी महिला व बालविकासात उमेद अभियान, ग्रामविकास विभाग, ग्राम पातळीवरील बचतगट, सर्व विभागांचे अभिसरण व समन्वय याबाबत महत्व विषद केले. एकात्मिक बालविकास आयुक्त इंदिरा मालो यांनी पोषण अभियान, विविध उपक्रम व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व उमेद मधून खर्‍या अर्थाने महिला,बाल व ग्राम विकास कसा होत आहे याबाबत सविस्तर सादरीकरण केले. भविष्यात कुपोषण मुक्त महाराष्ट हे उद्दिष्ट आपण सर्व विभाग मिळून लवकरच साध्य करू असा आशावाद व्यक्त केला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)