सीआरपीएफचे जवानाचे हृदविकाराने निधन

शिरवळ, दि. 31 (प्रतिनिधी) – खंडाळा तालुक्‍यातील पळशी गावचे सुपुत्र केंद्रीय राखीव दलाचे जवान रविराज वसंत गोळे (वय 34) यांचे तळोजा, मुंबई येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. तळोजा, मुंबई येथील केंद्रीय राखीव पोलीस दलात जवान रविराज गोळे हे कार्यरत होते. सोमवारी कर्तव्य बजावत असताना छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने वाशी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मूळ गावी पळशी येथे अंत यात्रा फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉली मधून काढण्यात आली. यावेळी अमर रहे अमर रहे, रविराज गोळे अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी परिसरातून अनेक शोकाकूल अंत्ययात्रेस सहभागी होते.
सातारा व मुंबई येथील जवानांनी मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सीआरपीएफचे सोनावणे साहेब यांनी श्रद्धांजली वाहताना तरुणांना रविराज गोळे यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी यापुढे जिद्दीने चिकाटीने सैन्यामध्ये भरती व्हावे, व जि. प. सदस्य उदय कबूले यांनी पश्‍चिम भागाच्यावतीने गोळे यांना श्रद्धांजली वाहिली. माजी उपजिल्हाध्यक्ष नितीन भरगुडे, शिरवळ पी.एस. आय. सागर आरगडे यांनी श्रद्धांजली वाहिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)