सिव्हीलमधील जैविक कचरा विघटन कक्ष धुळखात

उघड्यावरील जैविक कचरा कित्येक दिवस जैसे थे अवस्थेत

सातारा – जिल्हा शासकिय रूग्णालयातील जैविक कचरा विघटन कक्ष धुळखात पडला असून दैनंदिन तयार होणारा जैविक कचरा कित्येक दिवस आहे त्याच अवस्थेत उघड्यावर कक्षाबाहेरच टाकण्यात येत असल्याचे चित्र आहे.जैविक कचरा उघड्यावर टाकणे दंडनीय अपराध असून यामध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे.

-Ads-

सर्वसामान्य नागरिक तसेच सजीव अश्‍या सर्वच प्राण्यांना जैविक कचऱ्यामुळे धोका संभवतो. याची जाणीव आज जिल्हा रूग्णालयातील संबधित जैविक कचरा हाताळणाऱ्या व्यवस्थापकांना माहित नसल्याचे नवल वाटते. सुरेश जगदाळे जिल्हा शल्य चिकित्सक असताना अत्यंत चांगल्या पध्दतीने जैविक कचरा विघटन कक्षाची बांधणी करण्यात आली. जिल्ह्याचे रूग्णालयामध्ये स्वतंत्र जैविक विघटन कक्ष तयार करण्याची त्यांची संकल्पना आज धुळीने माखली आहे.

प्रामुख्याने जिल्हा शासकिय रूग्णालयात तयार होणारा जैविक कचरा आणि त्याची हाताळणी करताना त्याचे सुयोग्य व्यवस्थापन विलगीकरण करणे अत्यावश्‍यक आहे. यामध्ये जैविक कचरा व्यवस्थापन कायद्याच्या नियम व अटिचे पालन करताना दैंनंदिन स्वरूपात तयार होणारा जैविक कचरा हा लाल, निळ्या, पिवळ्या, व काळ्या आश्‍या रंगाच्या पिशव्यांमध्ये वर्गीकृत करूनच टाकायचा आहे. मात्र याठिकाणी असे केल्याचे दिसत नाही.

कोणत्याही पिशवीत कोणताही कचरा भरून तो उघड्यावर टाकण्यात आला आहे. खरं तर तो जैविक विघटन कक्षामध्ये ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच जैविक कचरा गोळा करणाऱ्या संस्थेलाच हा जैविक कचरा सुपूर्द करणे आवश्‍क आहे. या आधी देखील जिल्हा शासकिय रूग्नालयातील जैविक कचरा सोनगाव येथे टाकण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत संबधित विभागाने यांना नोटीसा देखील बजावल्या मात्र पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था पहायला मिळत असून जिल्हा शासकिय रूग्नालयातील जैविक कचरा व्यवस्थापनाकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देणे आवश्‍यक बनले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)