सिव्हीलच्या दारु अड्डाप्रकरणी दोघे पोलिसांच्या रडारवर

नगर, दि.17 (प्रतिनिधी )-जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये दारुचा अड्डा उद्धवस्त केल्यावर पोलिसांनी या गुन्ह्यात 3 जणांना अटक केली. मात्र या तिघांशी अनेकांचे संबध असल्याने पोलिसांनी कॉल डिटेल्स मागविले असून त्यानुसार दोघे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले. दरम्यान विषारी दारु प्रकरणी येत्या दोन दिवसांत न्याय वैद्यक प्रयोग शाळेचा अहवाल मिळण्याची शक्‍यता असून त्या अहवालनंतर अधिक चित्र स्पष्ट होईल असेही डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.

पांगरमल येथे राजकीय पार्टीमध्ये जेवणावळीमध्ये दारु पिल्याने सात जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे. पार्टीसाठी ज्या ठिकाणांहून दारू पोहच करण्यात आली. त्या ठिकाणी पोलीसांनी बुधवारी (दि.15 ) छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी दारु भेसळीसाठी आवश्‍यक असलेले साहित्य सापडले आहेत. तर दारु पिल्याने ज्या व्यक्‍तींचा मृत्यू झाला. त्याची पडताळणीसाठी नाशिक येथील न्यावैद्यक प्रयोग शाळेत नमुने पाठविण्यात आले असून येत्या दोन दिवसांत हे नमुने मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये दारुचा अड्डा उध्वस्त केल्यावर येथील आरोपींचे कोणाकोणशी संबध होते. त्यासंदर्भात कॉल डिटेल्स मागविण्यात आले आहे. याची पडताळणी सुरु असून यासंदर्भात दोघे आता पोलीसांच्या रडावर आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. मुख्य आरोपी मोहन दुग्गल हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

उत्पादन शुल्क खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही आरोपींशी संबध होते. त्यामुळे उत्पादन शुल्क खात्यातील दोषींवरही कारवाई होण्याची गरज आहे असा सुर सर्वत्र निघत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)