सिव्हिल इंजिनिअर्ससाठीचा नोकरी मेळाव्यास प्रतिसाद

पुणे – असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनिअर्स डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे आयोजित सिव्हिल इंजिनिअर्ससाठीचा नोकरी मेळावा गणेश कला क्रीडा केंद्र येथे उत्साहात पार पडला. यात एकूण 15 बांधकाम व्यावसायिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

मेळाव्यास सिव्हिल इंजिनिअर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बांधकाम व्यावसायिक कंपन्या व नोकरीची आवश्‍यकता असलेले सिव्हिल इंजिनिअर्स यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या उपक्रमासाठी संस्थेचे सदस्य निखिल शहा, प्रकाश भट, अशोक रेटवडे, विलास भोसले, मदन खांडेकर, सतीश यंबल, गोविंद देशपांडे, प्रवीण मुंढे, रियाझ पटेल यांनी पुढाकार घेतला होता. प्रारंभी प्राथमिक मुलाखती झाल्या असल्या तरी येणाऱ्या काही दिवसांत या उपक्रमांमधून 200 ते 300 जणांना नोकरी मिळू शकेल, असे संस्थेकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)