सिव्हिलच्या सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

 ठिय्या आंदोलन करताना जिल्हा रूग्णालयातील सफाई कर्मचारी

सकाळी ठिय्या आंदोलन…. संध्याकाळी ऍडव्हान्स खात्यावर जमा

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालयातील दीडशे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी दिवाळीचा ऍडव्हान्स आणि पगाराच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिन बाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र सायंकाळी पाच वाजता कामगारांच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झाल्याने सर्वांची दिवाळी गोड झाली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी पदभार स्वीकारून तब्बल तीन महिने झाले. त्यांच्या प्रशासकीय शिस्तीच्या प्रयत्नात दररोज वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत. पाच, पाच महिने पगाराचा पत्ता नाही. तशात दिवाळी तोंडावर. अगदी ऍडव्हान्स सुध्दा नाही. अशी टोकाची परिस्थीती झाल्याने सिव्हिलच्या स्वच्छतेची जवाबदारी सांभाळणाऱ्या दीडशे कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेअकरा वाजता सिव्हिल सर्जन डॉ. गडीकर यांच्या केबिनबाहेर ठिय्या केला. हे आंदोलन सुमारे दीड तास सुरु होते. ऍडव्हान्स व पगार मिळालाच पाहिजे या मागणीसाठी कर्मचारी हटून बसल्याने अडचणीची परिस्थिती निर्माण झाली होती. सिव्हिलच्या वेगवेगळ्या एकवीस विभागात सफाईची कामे ठप्प झाली. अचानक झालेल्या या आंदोलनाची झळ रुग्णांना बसली.
डॉ. आमोद गडीकर यांनी तत्काळ त्यांचे निवडक सहकारी व सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांची बैठक बोलावली. त्यावेळी सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे रूग्णालय व्यवस्थापन गांभीर्याने पहात नाही याची तक्रार करण्यात आली. तसेच पाच महिने पगाराला विलंब होतो आणि महिन्याचे आर्थिक गणित कोलमडते असे गाऱ्हाणे मांडण्यात आले. पगाराला विलंब का होत आहे ? या मुद्यावरून कर्मचारी व व्यवस्थापन यांची जोरदार खडाखडी झाली. पगार विलंबाची तांत्रिक अडचण आहे. कोषागार कार्यालयाकडून केवायसी करिता कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. उद्या पगार मिळतील असे स्पष्टपणे डॉ. गडीकर यांनी सांगितल्यावर कर्मचारी आश्वस्त झाले. सिव्हिल सर्जन यांनी स्वतः कोषागारात पाठपुरावा करून ऍडव्हान्स सायंकाळी पाच वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करून घेतला. त्यानंतर ठिय्या आंदोलन बारगळले. तसेच वेतन शनिवारीच त्यांच्या खात्यावर जमा होईल असे आमोद गडीकर यांनी “प्रभात ‘ शी बोलताना सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)