सिल्व्हरस्टर स्टॅलोनने केले “रेस 3’चे प्रमोशन

सलमान खान हा सिल्व्हरस्टर स्टॅलोनचा किती मोठा फॅन आहे, हे काही लपून राहिलेले नाही. त्याने स्वतःच्या “रेस 3’च्या प्रमोशन करताना स्टॅलोनचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. “रेस 3’च्या फॅमिलीमध्ये एका नवीन सदस्याची ओळख मी करून देतो आहे, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते. सगळ्यांना वाटले की “रेस 3’मध्ये स्टॅलोन छोटासा रोल करणार आहे की काय. पण यामध्ये मायकेल बी.

जॉर्डनची मुख्य भूमिका असलेल्या “क्रीड 2′ बद्दल स्टॅलोन बोलत असलेले दिसत आहे. स्टॅलोनने “रेस 3′ बद्दलही बोलावे, असा सूचक हेतू त्यातून व्यक्‍त होत होता. अर्थात स्टॅलोनला हा इशारा समजला. त्यानेही सलमानच्या “रेस 3′ बद्दल प्रमोशन करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली.

“सुपरहिरो सलमान खानला त्याच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा’ असे स्टॅलोनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याबरोबर त्याने “रेस 3’चे पोस्टरही शेअर केले आहे. इथेच घोटाळा झाला. सलमानचे कौतुक करताना स्टॅलोनने “रेस 3’मधील बॉबी देओलचा फोटो असलेले पोस्टर शेअर केले. “रेस 3’मध्ये सलमानबरोबर बॉबी देओल देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. पण स्टॅलोनला सलमान आणि बॉबी देओलमधील फरक समजला कसा नाही हे विशेष.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)