सिल्वर झोन सायन्स ऑलंपियाड आंतरशालेय स्पर्धेत शेवकर प्रथम

तळेगाव दाभाडे : स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका अय्यर व निवेदिता साहू.

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचालित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंगळवारी (दि.27) रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सायन्स ऑलंपियाड आंतरशालेय स्पर्धेत मयुरेश संजय शेवकर याने प्रथम क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन तसेच त्यांच्या विज्ञानाविषयी आवड निर्माण होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी 2 री ते 7 वी पर्यंतच्या 10 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अन्य सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक मिळाले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. शाळेतील विज्ञान शिक्षिका निवेदिता साहू यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष संदिप चंद्रकांत काकडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर व सर्व शिक्षकवृंद यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)