सिलेंडरची गळती झाल्याने घराला लागली आग

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या घरात मंगळवारी (दि. 2) सकाळी घरगुती सिलेंडरची गळती झाल्याने घराला आग लागली. यामध्ये धान्य व संसार उपयोगी साहित्य जळुन नष्ट झाले आहे. या आगीत अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अवसरी बुद्रुक गावच्या दक्षिणेला शेटे-गुणगेमळा येथे रामचंद्र गोविंद शेटे व त्यांचे तीन भाऊ शेजारी-शेजारी राहतात. शेटे यांनी आठ दिवसांपूर्वी एचपी गॅस सिलेंडरची टाकी भरुन आणली व मंगळवारी सकाळी 7 वाजता रेग्युलेटर लावला. सिंधुबाई शेटे या गॅस शेगडी पेटवत असताना सिलेंडरच्या टाकीने अचानक पेट घेतला. त्यानंतर सिंधुबाई जीव मुठीत घेवुन बाहेर पळाल्या; परंतु तोपर्यत संपूर्ण घराने पेट घेतला होता. त्यानंतर स्थानिक रहिवाशी संजय शेटे, अतुल शेटे, निलेश शेटे, किसन शेटे यांनी घरात पेटलेली सिलेंडरची टाकी बाहेर काढली. तसेच विहीरीवरील विद्युत मोटार चालु करुन पेटलेले घर पाण्याने विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घरातील गहु, बाजरीची पोती, किराणा साहित्य, गाद्या, कपडे आदी साहित्य नष्ट झाले.
घरावरील लाकडी वासे संपूर्ण पेटल्याने रामचंद्र शेटे यांचा प्रपंच उघड्यावर आला आहे. घरगुती साहित्य घराच्या अंगणात ठेवले आहे. रामचंद्र शेटे व सिंधुबाई शेटे हे दोघे पती पत्नी वयस्कर असल्याने एचपी गॅस कंपनीने त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी व घरांचे झालेले नुकसान द्यावे, अशी मागणी रामचंद्र शेटे व स्थानिक ग्रामस्थानी केली आहे. कळंब येथील एचपी डिलर्स बाळशिराम भालेराव यांनी अवसरी बुद्रुक येथील रामचंद्र शेटे यांच्या घरी जाऊन पाहणी केली व तातडीने नवीन एचपी गॅस देउन रेग्युलेटर व नळ बदलुन दिला. तसेच आर्थिक मदत करण्याची ग्वाही ही दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)