सिलिकॉन वापरा ऊस पिकात भरपूर फायदा मिळवा : दऱ्हाडे

कोपर्डे हवेली  – वेणूताई चव्हाण कॉलेज च्या श्रमसंस्कार शिबीर नडशी ता.कराड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अनिलकुमार दऱ्हाडे बोलत होते. सिलिकॉन म्हणजे वाळू , गारगोटी याची बारीकपूड शेतात किंवा ऊस पिकाला दिल्यामुळे पिकाला 31टक्के सिलिकॉन मिळते.

सिलिकॉन घटक ऊस पिकाची लांबी,जाडी वाढवण्यास पुरक असुन.सिलिकॉन च्या वापरामुळे ऊसाची पाने रुंद व जाड होतात त्यामुळे पिकाला सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात मिळतो व अन्न निर्मिती करणे सोपे जाते. ऊस पिकाचे वजन प्रत्येकी300ग्रॅंम पर्यंत वाढते त्याचबरोबर उसाची रिकव्हरी देखील वाढते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उंब्रज, कोणेगाव, नडशी येथील काही शेतकऱ्यांच्या ऊसावर सिलिकॉनचा वापर करून पिकाच्या चाचण्या घेतल्या असता त्या ऊस पिकांचे उत्पादन आधीच्या ऊसापेक्षा 300ग्रॅंम ऊसाचे वजन वाढल्याचे आढळून आले आहे.ऊसाचे वजन 3किलो.300ग्रॅंम भरले. सिलिकॉनच्या वापरामुळे ऊसाचे फुटवे अधिक वाढतात व कांडे लांब आकाराचे बनते. कार्यक्रमासाठी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक घार्गे यांनी केले तर आभार प्राध्यापक पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)