सिलिंगनंतर मालमत्तेचे भाव घसरले

गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत सुरू असलेल्या सीलिंगच्या कारवाईचा परिणाम रिअल इस्टेट बाजारावर दिसू लागला आहे. मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या रिअल इस्टेट सेक्‍टरमध्ये या कारणामुळे घसरण आली आहे. सीलिंगमुळे सुरू असलेल्या दुकानाच्या खरेदीतही घसरण झाली आहे. ज्याठिकाणी दुकानाचे भाव 25 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत घसरले आहेत, तेथेच फ्लॅटसचे रेट सुद्धा 12 ते 15 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. दुसरीकडे शॉपिंग सेंटर किंवा बाजारात भाड्याने दिलेले दुकाने देखील आता रिकामे होताना दिसून येत आहेत.

तज्ञांने दिलेल्या माहितीनुसार, मंजूरी मिळत नसल्याने सीलिंग होत असल्यामुळे भाड्याने दुकान घेऊन लाखो रुपये अडकवून ठेवण्यात व्यापारी तयार नाहीत. बेकायदा कॉलनीत तयार झालेल्या फ्लॅटच्या किंमतीत घसरण आली आहे. अनिश्‍चिततेमुळे अशा प्रकारच्या कॉलनीत खरेदीसाठी कोणीही तयार नाही. मात्र नियमित कॉलनीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे दिसते.

राकेश माने 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)