सिरीयातून अमेरिकेचे सैन्य माघारी बोलावले जाईल

ट्रम्प यांच्या ट्‌विट नंतर आघाडी फौजांकडून विरोध

बैरुत: सिरीयामध्ये इस्लामिक स्टेटचा पूर्ण पाडाव झाला असल्याने आता अमेरिकेचे सैन्य माघारी बोलावले जाईल, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. मात्र अमेरिकेने एवढ्यात सिरीयातून सैन्य काढून घेऊ नये, असे आघाडी फौजांमधील प्रमुख सहकाऱ्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यास त्याचा फायदा इस्लामिक स्टेटला होईल अशी भीती कुर्दिश नेतृत्वाखालील सिरीयन डेमोक्रॅटिक फोर्सेसनी म्हटले आहे.
इस्लामिक स्टेटविरोधातील युद्ध अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. इस्लामिक स्टेटचा पूर्ण पाडाव झालेला नाही. अशावेळी अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यास इस्लामिक स्टेट पुन्हा सबळ होईल, असे आघाडीच्या दलांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिरीयामध्ये अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कुर्द सैन्याला सहाय्य केले होते. सिरीयाच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागात गेल्या चारवर्षातल्या युद्धामध्ये अमेरिकेच्या लढाऊ विमानांमुळे कुर्दिश सैन्याला मोठे सहाय्य झाले होते. त्यासंदर्भात कुर्दिश सैन्याचे अधिकारी आणि प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री विचारविमर्श केला. फ्रान्स आणि इंग्लंड यांनीही अमेरिकेने इतक्‍यात सिरीयातून माघार घेऊ नये, असे मतप्रदर्शन केले आहे.

तुर्कीचे अध्यक्ष रिसेप इर्डोगन यांनी कुर्द सैन्याविरोधात आघाडी उघडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सिरीयाचे अध्यक्ष बशर असाद यांचे बळ वाढेल. त्यांना इराण आणि रशियाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे सिरीयामध्ये वर्चस्वासाठी दोन आघाड्या आमने सामने येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

दरम्यान सिरीयातील युद्धामध्ये अमेरिकेचा सहभाग केवळ इस्लामिक स्टेटच्या पाडावापुरताच मर्यादित होता. सिरीयात कोणाचे सरकार असावे, हे ठरवण्यासाठी अमेरिकेचा पुढाकार नव्हता, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)