सिरीयातील लष्करी गुप्तहेर केंद्राजवळ बॉम्बस्फोट

दमास्कस (सिरीया): सिरीयाची राजधानी दमास्कसमध्ये आज झालेल्या भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बहल्ल्याच्यावेळी एका दहशतावाद्यालाही अटक करण्यात आली आहे. लष्करी गुप्तहेर केंद्राच्या मुख्यालयाजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटामध्ये नक्की कितीजण मरण पावले किंवा जखमी झाले, याचा तपशील मिळू शकलेला नाही.

राजधानी दमास्कसमध्ये अशाप्रकारे बॉम्बस्फोट होणे फार दुर्मिळ मानले जात आहे, असे “सना’ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा स्फोट पेरलेल्या बॉम्बमुळे झाला की आत्मघातकी हल्ल्यामुळे झाला याची देखील नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. या बॉम्बस्फोटानंतर लगेच या भागामध्ये जोरदार गोळीबार झाला.

याशिवाय सिरीयाच्या उत्तरेकडील अफ्रिन शहरात झालेल्या आणखी एका बॉम्बस्फोटामध्ये तिघेजण मरण पावले तर 9 जण जखमी झाले आहेत. कुर्द बहुसंख्य असलेल्या भागावरील तुर्कीच्या वर्चस्वाला वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाच्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला. सिरीयामध्ये 2011 पासून सुरु असलेल्या यादवी युद्धामुळे किमान साडे 3 लाख लोक मरण पावले आहेत. तर लक्षावधी लोकांना निराश्रित व्हावे लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)