“सिरीयल किसर’इम्रानच्या मते आता किसींग सीनमध्ये थ्रील नाही 

‘सीरियल किसर’ असा छाप बसलेला अभिनेता इम्रान हाश्‍मी म्हणतो की, पूर्वीसारखे किसिंग सीन प्रेक्षकांना आता फारसे उत्तेजित करत नाहीत. ‘दहा-पंधरा वर्षांपूर्वी प्रेक्षकांना उत्तेजित करण्यासाठी चित्रपटांमध्ये किसिंग सीन आवश्‍यकता नसतानाही टाकले जात असत. त्यावेळी त्याचा प्रेक्षकांवर परिणामही होत असे. मात्र आता प्रेक्षक मॅच्युअर्ड झाले आहेत.
आता त्यांना किसिंग सीन पाहून फार काही वाटत नाही. पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी ‘मर्डर’ चित्रपट केला, तो काळ पूर्णपणे वेगळा होता. आता काळ बदलला आहे. केवळ किसिंग सीन आहे, म्हणून मी चित्रपट स्वीकारत नाही. कथानक आणि भूमिका पाहूनच मी चित्रपट स्वीकारतो,’ असे इम्रान म्हणाला. अमित लोढा यांच्या ‘बिहार डायरीज’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला इम्रान उपस्थित होता. त्याप्रसंगी तो बोलत होता. त्याच्या सिनेमांमध्ये वारंवार किसींग सीन असल्यामुळे त्याला “सिरीयल किसर’ असे टोपणनाव मिळाले. बॉलिवूडमधील अनेक हिरोईनबरोबरचे त्याचे असे सीन खूप गाजले होते. त्याच्या या किसींग सीनमुळे काही अभिनेत्यांना त्याच्याबद्दल आसुया वाटत असे, असेही बोलले जात होते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)