सियाचीनजवळ 36 किमी लांबीचा चिनी रस्ता

पाकिस्तानकडून जमिनीची भेट

बीजिंग – चीन पाकव्याप्त काश्‍मीरमधील शक्‍स्गम भागात 36 किमी लांबीचा रस्ता बनवत आहे. यापैकी 21.3 किमी चा रस्ता बनवून तयार असून बाकी रस्त्याचे काम चालू आहे. 1963 साली सीमा कराराअंतर्गत पाकव्याप्त काश्‍मीरमधील शक्‍सगम भाग पाकिस्तानने चीनला देऊन टाकलेला आहे. मात्र भारताने या करारास मान्यता दिलेली नाही आणि हा भाग पाकव्याप्त काश्‍मीरचाच असल्याचे भारत मानत आहे.

शक्‍सगम घाटीचा भाग हा सियाचीनजवळून जातो. या भागात रस्ता तयार करण्यामागता चीनचा हेतू अगदी उघड आहे. या रस्त्यामुळे चीनला आपले लष्कर भारतीय सीमाभागात अगदी सहजपणे आणता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)