सिम स्वाईप करून वृद्धाची 37 लाखांची फसवणूक

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) – सिम स्वाईपचा वापर करून कोडोली येथील एका वृध्दाची तब्बल 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विलास मारूती सोनमळे (वय 63) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सोनमळे येथील अभिजीत इकिवपमेंट कंपनीत लेखापाल म्हणून कामाला आहेत. सोमवारी त्यांच्या मोबाईलवर कंपनीचा मेसेज आला. तेव्हा त्यांनी रिटर्न कॉल केला. त्यानंतरच दहाच मिनिटात सिम स्वाईप तंत्राचा वापर करून त्यांच्या खात्यातील 37 लाख 78 हजार रुपये ऑनलाईन लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)