सिमेंटचे बोलार्ड ठरताहेत कुचकामी

दुचाकीसाठी तोडले जाताहेत नवेकोरे बोलार्ड

पुणे – महापालिकेकडून नव्याने तयार करण्यात आलेले पदपथ तसेच सायकल ट्रॅकवर दुचाकीस्वारांनी अतिक्रमण करू नयेत म्हणून महापालिकेकडून या ठिकाणी सिमेंटचे बोलार्ड बसविण्यात येत आहेत. मात्र, हे बोलार्ड कुचकामी ठरत असून रातोरात हे बोलार्ड फोडले जात आहेत. त्यामुळे या बोलार्डवर करण्यात आलेला खर्च वाया जात असून या तोडण्यात आलेल्या बोलार्डच्या जागेवर नव्याने स्टीलचे बोलार्ड लावले जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांत पदपथावर होणारे दुचाकींचे अतिक्रमण रोखण्यासाठी नगरसेवकांच्या निधीतून स्टीलचे बोलार्ड बसविले जात होते. त्यासाठी येणारा खर्चही मोठ्या प्रमाणात होता. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून शहरात सिमेंटचे बोलार्ड बसविण्यात येत आहेत. प्रामुख्याने ज्या रस्त्यावर नव्याने पदपथ तसेच सायकल ट्रॅक विकसित करण्यात आले आहेत, त्या ठिकाणी हे बोलार्ड बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यातून दुचाकी जात नसल्याने अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जेसीबी तसेच इतर जाड साहित्याच्या माध्यमातून तोडण्यात आले आहेत. प्रामुख्याने सातारा रस्ता, सिंहगड रस्ता या भागांत नव्याने उभारलेले हे बोलार्ड तोडण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होताच, या तुटलेल्या बोलार्डमधून वाहने पुन्हा पदपथावर येत असून पदपथाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)