सिमल्यामधील बलात्कार हत्या प्रकरणात लाकूडतोड्याला अटक

नवी दिल्ली – सिमल्यातील कोतखाय भागात अल्पवयीन शालेय मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सीबीआयने 25 वर्षीय लाकूडतोड्याला अटक केली आहे. या लाकूडतोड्याची पार्श्‍वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामध्ये हिमाचल प्रदेश पोलिसांनी यापूर्वी पाच जणांना अटक केली होती. मात्र या गुन्ह्यामध्ये या पाच व्यक्‍तींच्या सहभागाचा कोणताही पुरावा सीबीआयला उपलब्ध झालेला नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये या शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तेंव्हापासून हिमाचल प्रदेशातील तत्कालिन कॉंग्रेस सरकार विरोधात मोठा जनक्षोभ निर्माण झाला होता.

सीबीआयने 22 जुलै 2017 रोजी हिमाचल पोलिसांकडून या तपासाची सूत्रे हाती घेतली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सीबीआयचे तब्बल 40 अधिकारी सहभागी झाले होते. गेल्या 9 महिन्यांपासून हे अधिकारी अतिशय गुप्तपणे स्थानिक नागरिकांमधून या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या प्रयत्नांमध्ये होते. गुन्हेगारी पार्श्‍वभुमी असलेल्या नागरिकांबाबत सखोल चौकशीही केली जात होती. याच संदर्भात मिळालेल्या माहितीचा पाठपुरावा करून काश्‍मीर आणि उत्तराखंडमध्येही सीबीआयने तपास केला होता. सीबीआयच्या संचालकांकडून सुरूवातीपासून या प्रकरणाच्या तपासावर देखरेख केली जात होती. गुन्ह्याच्या तपासाबाबत त्यांनी समाधान व्यक्‍त केले असून सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असल्याचे सीबीआयच्या प्रवक्‍त्याने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)