सिमंड्‌स मार्शल कामगारांना 15 हजारांची वेतनवाढ

पिंपरी – कासारवाडी येथील सिमंड्‌स मार्शल लिमिटेड आणि मार्शल कामगार संघ यांच्यामध्ये नुकताच वेतनवाढीचा करार पार पडला. या करारानुसार तीन वर्षांसाठी 15 हजार रुपये इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या वाढ करण्यात आली. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2019 या तीन वर्षे कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे. कंपनीतील 240 कामगारांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती मार्शल कामगार संघाचे सरचिटणीस लक्ष्मीकांत भोर यांनी दिली.

या त्रैवार्षिक करारामध्ये 8500 या रकमेवर 50 टक्‍के बेसिक व 50 टक्‍के इतर भत्ते अशी वाढ आणि महागाई भत्ता प्रति पॉइंटमध्ये वाढ करून 1580 इतकी प्रति महिना वाढ करण्यात आली आहे. या करारामध्ये नेट इन्व्हाईस सेल ही नवीन योजना मान्य करून त्यामध्ये प्रत्येकी कमीत कमी 2050 रुपये प्रति महिना अशी एकूण 12 हजार 130 रुपयांची; तसेच वार्षिक वाढ व प्रवास भत्ता यामध्ये वाढ करण्याचे मंजूर करण्यात आले. याबरोबरच संघटनेने विविध प्रकारच्या सुविधा कामगारांसाठी उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी आणि उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. कामगारांच्या मुलांसाठी दहावी व बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळविल्यास 2 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचे मान्य करण्यात आले.

सेवाज्येष्ठतेनुसार लॉंग सर्व्हिस ऍवार्ड 10 वर्षे सेवाकाळापासून सुरुवात करून त्यामध्ये दोन हजार ते बारा हजारांपर्यंत बक्षीस देण्याचे ठरले. वार्षिक हजेरी बक्षीस 2300 रुपये करण्यात आले. आरोग्य विमा पॉलिसी कामगार, कुटुंब व पालकांसाठी चार लाख रुपये आणि 20 लाख बफर रक्‍कम मंजूर करण्यात आली.

कामगारांच्या पत्नीच्या प्रसूतीसाठी 30 ते 40 हजार रुपये देण्याचे ठरले. प्रतिवर्षी मेडिकल बिलासाठी 2 हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. अपघाती विमा पॉलिसी साडेबारा लाख रुपये करण्यात आली आहे. सेवाकाळामध्ये एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसाचा पगार व कंपनी त्याच्या तीनपट पगार त्याच्या कायदेशीर वारसास दिला जाणार आहे. कराराच्या कालावधीमधील सर्व फरक व्यवस्थापनाने देण्याचे मान्य करण्यात आले.

या करारावर मार्शल कामगार संघाच्या वतीने अध्यक्ष राजन नायर, सरचिटणीस लक्ष्मीकांत भोर, उपाध्यक्ष आशुतोष शिंदे, सहसचिव सचिन जाधव, सुहास माने, तर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कंपनी सीईओ हेमंत पाटील, व्यवस्थापक प्रदीप राजाज्ञा, टी. व्ही. थंपी, अनिल अनिखिंडी, डॉ. नितीन मेटकर, नितीन दबडे, रणजित पाटील, प्रसाद राणा आदींनी स्वाक्षऱ्या केल्या. कामगारांनी गुलाल व भंडारा उधळून आनंदोत्सव साजरा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)