सिनेतारकांची मांदियाळी!

  • एकाच ठिकाणी दहिहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय

तळेगाव दाभाडे,  (वार्ताहर) – येथील स्टेशन विभागातील सुमारे 35 सार्वजिनिक मंडळे आणि संस्थांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी दहिहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती तळेगाव स्टेशन सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे आणि अध्यक्ष राहुल खांडगे यांनी दिली.

इस्कॉन श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सोमवार दि. 14 ला सकाळी 8 ते दुपारी 1 व सायंकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत प्रवचन, कीर्तन, भजन, महाआरती, प्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेजारील प्रताप भोगे मेमोरियल हॉस्पिटलजवळील मैदानात मंगळवार दि. 15 ला सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत दहिहंडी पूजन, बालगोपाल मिरवणूक, भजन व कीर्तन व महाप्रसाद होईल.

दहिहंडीसाठी राज्यातील नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित करण्यात आले आहे. दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 7,77,777 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. यानिमित्त बाबा पठाण निर्मित मराठी व हिंदी गीत तसेच नृत्यांचा बहारदार कार्यक्रम मिलन ऑर्केस्ट्रा असून प्रमुख उपस्थिती माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील व अनिता दाते, नकटीच्या लग्नाला यायचं हं’ प्राजक्‍ता माळी, ढोलकीच्या तालावर विजेती जोडी मीनाक्षी पोशे व पालक मोरे आदी उपस्थितीत राहणार आहेत.

सामाजिक एकता जोपासण्यासाठी या उपक्रमात सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीकृष्णावरील सांस्कृतीक कार्यक्रम आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त नामांकित कलाकारांच्या उपस्थितीत देशभक्‍तीपर गीतांचा कार्यक्रमही होणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. विघ्नहर्ता प्रतिष्ठान, हनुमान मित्र मंडळ, स्वामी समर्थ मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळ, जनसेवा मित्र मंडळ, वीरचक्र मित्र मंडळ, आई तुळजा भवानी प्रतिष्ठान आणि श्री शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठानसह सुमारे 35 मंडळांचा आयोजनात समावेश असल्याचे राहुल खांडगे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिन आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव प्रथमच एकाच दिवशी येत असल्याने सामाजिक एकोपा साधण्यासाठी सर्व पक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असल्याचे माजी नगराध्यक्ष व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सुरेश धोत्रे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)