सिध्दगिरी मठाच्या विक्री केंद्रासाठी कोल्हापूरात जागा देऊ – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – जनतेचे आरोग्य जोपासण्यासाठी सेंद्रीय भाजीपाला व फळे उत्पादने उपयुक्त असून सिध्दगिरी मठाच्या या सिध्दगिरी नॅचरल्स उपक्रमासाठी कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणी विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सिध्दगिरी मठाच्या वतीने सुरु केलेल्या सेंद्रीय भाजीपाला, फळे उत्पादन विक्री केंद्र आणि घरपोच फिरत्या विक्री केंद्राचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कणेरी मठाचे मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी, तानाजी निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देवून सेंद्रीय उत्पादनांना बाजार पेठा उपलब्ध करुन देण्यासाठी सिध्दगिरी मठाने घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. सेंद्रीय शेतीमुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ आणि ग्राहकांना सेंद्रीय उत्पादने उपलब्ध होणार आहेत. यामुळे जनतेची सामाजिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार आहे.

तसेच सिध्दगिरी नॅचरलच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाद्वार येत्या डिसेंबरपर्यंत 1 लाख ग्राहकापर्यंत पोहचण्याचा मठाचा संकल्प असून यास निश्‍चितपणे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)