सिद्धू पाजी इन्कम टॅक्सच्या रडारवर

नवी दिल्ली – पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे  सध्या  इन्कम टॅक्सच्या रडारवर असून,प्राप्तिकर विभागाने सिद्धू यांची दोन बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे  सिद्धू यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

सिद्धू यांनी आपल्या विवरण पत्रात कपड्यांवर २८ लाख, प्रवासावर ३८ लाखांपेक्षा जास्त इंधन खर्च तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ४७ लाखांहून अधिक खर्च झाल्याचे दाखवले आहे. वर्ष २०१४-१५ च्या विवरण पत्रात सिद्धू यांनी हे खर्च दाखवले नव्हते. त्यांनी अजून याचे बिलही सादर केलेले नाही.

परंतु, सिद्धू यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली असल्याचे सांगितले आहे. एकतर या सर्वांचे बिल सादर करा किंवा कर भरून टाका, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.तसेच  प्राप्तिकर विभागाकडून त्यांची दोन बँक खाते देखील गोठवण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)