सिद्धूच्या मारामारीच्या जुन्या प्रकरणावर होणार पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली – पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिंद्धू यांची 30 वर्षापूर्वीची रस्त्यावरील मारामारीची केस सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ओपन केली आहे. याच केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला पुराव्या अभावी 1000 रुपये दंड करुन सोडून दिले होते. पण, गुरुनाम सिंग यांच्या नातेवाईकांनी या निर्णयाविरुध्द पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याच्यावर सुवानणी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस ए.एम. खानविलकर आणि जस्टिस संजय किशन खंडपीठाने घेतला आहे.

सिद्धू आणि त्यांच्या मित्रचा 1988 सली गाडी पार्किंगवरुन गुरुनाम सिंग यांच्या सोबत वाद झाला होता. या वादाचे मारामारीत रुपांतर झाले. काही दिवसांनी गुरुनाम सिंग यांचा मृत्यू झाला. या संदर्भात 15 मेला सर्वोच्च न्यायालयाच्या चमलेश्वर खंडपीठाने सिद्धूला 1000 रुपयाचा दंड केला होता. हा निर्णय देताना सिद्धूची गुरुनाम यांच्याशी कोणतेही वैर नव्हते. या घटनेमध्ये कोणतेही शस्त्र वापरण्यात आले नव्हते याच आधारावर सिद्धूला 1000 रुपयाचा दंड करणे योग्य असल्याचे या खंडपीठाचे मत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)