सिद्धूंचा पाकिस्तान दौरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात-खलिस्तानी

दहशतवाद्याबरोबर फेसबुकवर फोटो

चंदीगड (पंजाब/हरियाणा) – कॉग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांचा पाकिस्तान दौरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मागील वेळी पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा यांची गळाभेट घेण्यामुळे सिद्धू टीकेचे लक्ष्य झाले होते.

खलिस्तान समर्थक दहशतवादी आणि पीएसजीपीसी (पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती) चे महासचिव गोपाल सिंह चावला यांनी सिद्धू बरोबरचा आपला फोटो फेसबुकवर टाकला असून ” सिद्धू पा जीं बरोबर’ अशी कॅप्शन टाकली आहे. सिद्धू यांचा मतदार संघ असलेल्या अमृतसर येथील निरंकारी भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गोपाल सिंह चावलाचा हात होता.

सिद्धू त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करतात आणि फोटो काढून घेतात, तेव्हा सिद्धू यांची राष्ट्रहिताला प्राथमिकता आहे किंवा नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे अशी मागणी एसएडी (शिरोमणी अकाली दल) चे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी केली आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिझ सईद याच्याशीही गोपाल चावला याची जवळीक आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या आयएसआय आणि खलिस्तानी यांच्या बैठकीत गोपाल चावलाचा सहभाग होता. सोशल मीडियावरही सिद्धू यांच्यावर टीकेचा जोरदार मारा होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)