इम्रान खान यांनी मानले सिद्धुंचे आभार


शांतीदूत म्हणून गौरवले

इस्लामाबाद – भारतातील माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धु यांनी आपल्या शपथविधीसाठी सीमा पार करून पाकिस्तानला जी भेट दिली त्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचे आभार मानले आहेत. नवज्योत सिद्धु हे शांती दूत आहेत असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले असून सिद्धु यांच्यावर टीका करणारे उपखंडातील शांततेला बाधा आणण्याचेच काम करीत आहेत अशी शेरेबाजीही त्यांनी केली आहे. शांततेशिवाय आपण प्रगती साधू शकत नाही असेही इम्रान खान यांनी या टीकाकारांना सुनावले आहे.

आपल्या ट्‌विटर संदेशात त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. या संबंधात इम्रान खान यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांनी आपसात चर्चा करून आपसातील संबंध सुधारण्याची गरज आहे. काश्‍मीर सारखे प्रश्‍न चर्चेच्या मार्गानेच सुटू शकतात.

आपल्या उपखंडात शांतता कायम ठेऊन लोकांचे दारिद्रय दूर करायचे असेल तर चर्चेद्वारे प्रश्‍नांची उकल करून तोडगा काढणे हाच उपाय आहे. याच संदेशात त्यांनी सिद्धु यांचेही आभार मानले आहेत. पाकिस्तानातील जनतेने त्यांना अपार प्रेम दिले आहे असेही त्यांनी यात नमूद केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)